शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावचे सुपुत्र अण्णासाहेब महादेव खंडागळे यांची नुकतीच बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.त्यामुळे त्यांच्यावर जिल्हाभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ साठी जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील आय.एस. ओ. मानांकित जि. प. प्रा. शाळा नफरवाडी चे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले अण्णासाहेब महादेव खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे.
उपक्रमशील शिक्षक अण्णासाहेब खंडागळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच नफरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी तसेच शाळेच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. लोक सहभागातून शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज झालेली आहे. शाळेत बाला उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी करण्यात आलेली आहे तसेच माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रमही त्यांनी प्रभावीपणे राबवला आहे.ते पुस्तकी शिक्षणासोबतच तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांच्या स्वप्नांना आकाश मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांनी जि.प.प्रा.शा.नफरवाडी या शाळेत बाल आनंद मेळावा,अपूर्व विज्ञान मेळावा,शालेय स्तरावर दर पंधरा दिवसाला सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन,इंग्रजी विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी We Learn English,Leap For Word,शैक्षणिक सहलीचे आयोजन,सांस्कृतिक कार्यक्रम,सुंदर हस्ताक्षर उपक्रम,उत्कृष्ट फलकलेखन,वृक्षारोपण,स्वच्छता जनजागृती,अवकाश निरिक्षण अस्ट्रोनॉमी क्लब,आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत .
हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी त्यांना शाळेतील त्यांच्या सहकारी शिक्षिका उपदेशी मॅडम,माने मॅडम,काकडे मॅडम, वावरे मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.त्याचबरोबर
शाळेचा भौतिक विकास आणि गुणात्मक विकास करण्यासाठी त्यांना गावचे सरपंच बंडू सवासे उपसरपंच आबाराजे चव्हाण, माजी सरपंच भिमराव तांबे माजी उपसरपंच सुभाष सवासे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष भारत ढेरे, शहाजी चव्हाण,उपाध्यक्ष सुधीर सवासे, बाळू ढोले, भरत तांबे,शिवाजी ढेरे,दगडू मंडलिक,लहू दराडे,रघुनाथ दराडे,प्रभाकर मंडलिक,तुषार दराडे, विद्यमान शा.व्य.समितीचे अध्यक्ष प्रभाकर मंडलिक,उपाध्यक्ष किशोर तळेकर,आजीनाथ चव्हाण, रविकांत वनवे,अरुण दराडे,बाबू ढेरे,प्रदिप वाघ,विष्णू तांबे,विष्णू ढेरे,सुधीर सवासे, बापूराव पवळ आदींचे सहकार्य लाभले.गाव आणि शिक्षक यांच्या सुंदर कल्पकतेतून वेगळी ओळख निर्माण करणारी शाळा तयार केली.
त्यांनी विद्यार्थी विकास आणि गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीच्या वतीने अण्णासाहेब खंडागळे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी ही त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श मित्र मंडळ पाटोदा च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाई बाबाजी प्रतिष्ठान आष्टी यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार, शिक्षक समिती बीड यांच्याकडून जिल्हास्तरीय गुरू गौरव पुरस्कार तसेच दैनिक दिव्य लोकप्रभा यांच्याकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत .
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अण्णासाहेब खंडागळे यांचे गटशिक्षणाधिकारी पाटोदा पिकवणे साहेब,जेष्ठ शिक्षणविस्ताराधिकारी बोंदार्डे साहेब, शेळके साहेब,गव्हाणे साहेब,सुळे साहेब,शिंदे साहेब,पाटोदा गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख येवले सर, शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक बंधू भगिनी,राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी कौतुक केले आहे.
•हा पुरस्कार फक्त माझा नसुन माझे विद्यार्थी, माझ्या सहकारी शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती नफरवाडी,नफरवाडीचे संपूर्ण ग्रामस्थ तसेच माझे कुटुंब, नातलग, माझे सर्व मित्र, मला माझ्या सेवेमध्ये आतापर्यंत लाभलेले सर्व सहकारी शिक्षक,शिक्षिका बंधू भगिनी, अधिकारी वर्ग यांच्या अस्तित्वरुपी प्रेरणेची झालर म्हणजेच हा पुरस्कार आहे याची मला नम्र जाणीव आहे.
अण्णासाहेब खंडागळे
जि.प.प्रा.शा.नफरवाडी
ता.पाटोदा जि. बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा