लोकनेते आ.सुरेश आण्णा धस यांनी पाटोदा शहरसाठी रमाई आवास अंतर्गत १९० घरकुल केले मंजूर – प्रा.लक्ष्मण वाघमारे

 



पाटोदा: शिव जागृती न्यूज

पाटोदा शहरासाठी रमाई आवास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस साहेब यांच्या प्रयत्नाने पाटोदा शहरासाठी सन 19 - 20 व 21 - 22 साठी मोठ्या प्रमाणात पाटोदा शहरासाठी रमाई आवास योजना तून घरकुल लाभार्थ्यांना मिळून देण्यात आले आहे.पाटोदा नगरपंचायत च्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागून घेऊन लोकनेते आ.सुरेश आण्णा धस यांनी समाज कल्याण बीड येथे प्रयत्न करून 190 घरकुल मंजूर केले आहेत. आण्णा नेहमीच विकासाच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी रमाई आवास योजनेतून पाटोदा नगरपंचायत ला निधी उपलब्ध करून देत असतात. शेवटच्या घटकापर्यंत योजना पोचली पाहिजे असा त्यांचा दूर दृष्टिकोन असतो.त्यासाठी नगराध्यक्ष श्री.अबू शेठ,श्री बळीराम पोटे,सभापती श्री.किशोर अडागळे यांच्या मार्फत अर्ज मागून घेऊन त्यांनी सुद्धा प्रयत्न करून समाज कल्याण बीड मधून अर्ज कागदपत्रांचे पाठपुरावा करून घेतले आहेत. या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाल्यामुळे पाटोदा शहरातील लाभार्थ्याच्या वतीने प्रा.लक्ष्मण वाघमारे, संजय जावळे, अरविंद सरवदे,कमलाकर नारायणकर चेतन जावळे, रवी जावळे, यांनी केलेल्या कामाबद्दल लोकनेते आ.सुरेश आण्णा धस नगराध्यक्ष श्री. अबू शेठ,उपनगराध्यक्ष श्री.शरद बामदळे,श्री.बळीराम पोटे सभापती श्री.किशोर अडागळे सर्व नगरसेवक पाटोदा नगरपंचायत यांचे विशेष आभार मानले आहेत.

टिप्पण्या