कोणी विकली भजे;तर कोणी विकला वडापाव
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबाराजुरी मध्ये बुधवार (दि. 28) रोजी कोणी वडापाव विकला, कोणी भजी विकली तर कोणी भाजीपाला विकून आठवडी बाजाराचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने यंदाही जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा तांबा राजुरी आयोजित आठवडी बाजारात जवळ पास सात हजारापर्यंत उलाढाल झाली.
80 विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबाराजुरी शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले.मुलांनी आपल्या शेतातून आणलेला भाजी-पाला कांदे,बटाटे ,वांगे ,कोथिंबीर, टोमॅटो, भेंडी, गवार, लसूण, पेरू, लिंबू, यासह खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, मसाला पापड, पोहे, भजे,बिस्किट, चॉकलेट, चिक्की आदी पदार्थ विद्यार्थ्यांनी बाजारात विक्रीसाठी ठेवले होते.
बाजारातून गावातील महिला व पुरुष, पालक, ग्रामस्थ यांनी आवर्जून लहान मुलांकडून खरेदी केली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष तांबे, उपाध्यक्ष श्री बबन पवार सर , ईनुस शेख सर, मुरली तांबे,अशोक तांबे, केशव तांबे, पप्पू नेमाने, विठ्ठल तांबे , हारीदास तांबे, शहादेव नेमाने, किरण कदम आदी ग्रामस्थांनी तसेच महिलांनी या बाजाराला भेट देऊन मुलांचे कौतुक करून खरेदी केली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक परशुराम सोंडगे सर म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शिक्षकांच्या संकल्पनेतून आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यार्थ्यांना खरोखरच खूप काही शिकायला मिळते. सोबतच गणित विषयाशी निगडित अन्य व्यावहारिक ज्ञानही त्यांना मिळते.शाळेमध्ये विविध उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो,यापुढेही राबवले जातील असे मुख्याध्यापक परशुराम सोंडगे सर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महानवर मॅडम, गाडेकर मॅडम,राठी मॅडम यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा