शर्मिला देशमुख-घुमरे यांना साहित्यगंध कवयित्री पुरस्कार प्रदान


 

शिव जागृती न्यूज


मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने दि 3 नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन लातूर शहरात केले होते. या संमेलनास महाराष्ट्रातून अनेक कवी - कवयित्री हजर होते या संमेलनात 91 कवी कवयित्रींना साहित्यगंध पुरस्कार प्रदान करण्यात आले, 35 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, 10 संपादकांना उ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, 5 जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले. यात शर्मिला देशमुख -घुमरे यांना राज्यस्तरीय साहित्य गंध पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवमती सविता पाटील ठाकरे या होत्या तर प्रमुख उपस्थिती माजी खा डॉ सुनील गायकवाड, माजी प्राचार्य डॉ माधव गादेकर, राहुल पाटील नागपूर यांची होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


मराठीचे शिलेदार संस्था राज्यस्तरीय मराठी भाषेचे संवर्धन करणारी संस्था असून या संस्थेमुळे नवनवीन कवींना प्रेरणा देण्याचे काम हि संस्था करते तसेच कवींना व्यासपीठ निर्माण करून देते. संस्थे च्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन केले जाते. शर्मिला देशमुख - घुमरे याना साहित्यगंध पुरस्कार मिळाल्या बद्दल बीड जिल्ह्यातील विविध स्तरांतील अनेक मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या