पाटोदा ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्याम भाऊ राजपूत यांची निवड झाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशना नंतर संघटनात्मक फेर बदल करण्याचे काम नूतन राज्य अध्यक्ष विजय कोंबे यांनी केले.मराठवाड्याची कार्यकारिणी देतांना मराठवाडा अध्यक्ष म्हणून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणारे, दांडगा जनसंपर्क असणारे श्याम भाऊ राजपूत यांची निवड करण्यात आली.
या निवडी नंतर त्यांच्यावर मराठवाड्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या या निवडी नंतर त्यांचा भव्य सत्कार साने गुरुजी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सतिश जाधव, लक्ष्मीकांत धाडबले, शिवाजी डुकरे, नितीन सातपुते, राजु डिके, दत्तात्रय थोरात, वरून शेळके, उद्धव शेळके,सुनील धाडबले, संतोष भाबड, गंगाराम घुमरे,विठ्ठल शेळके, काशिनाथ गावित, वसंत निलेवाड, राजेंद्र पांडव, नरेंद्र अहिरे, अतुल भवर, ज्ञानेश्वर गिरगुणे, फारूक शेख, विजय वाळके, रामेश्वर पवार, ईश्वर कुमावत, शिवाजी गाढे, सुरेश पानसरे,नामदेव चोरे, अशोक सोनवणे यांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा