तांबाराजुरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे आरोग्य विषयक व्याख्यान संपन्न



मौखिक आरोग्य तुम्हाला एका निरोगी जीवनाकडे घेऊन जाते - डॉ.भारती 

पाटोदा : शिवजागृती न्यूज नेटवर्क 

पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.17 रोजी आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बबन पवार सर व प्रमुख पाहुणे /व्याख्याते डॉ.भारती (समुदाय आरोग्य अधिकारी)  यांची उपस्थिती होती.

तोंडाचे व दाताचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे.मौखिक व दंत आरोग्याची काळजी घेतली तर आपण निरोगी जीवन जगू शकतो. ब्रश करण्याच्या पद्धती, हात स्वच्छ करण्याच्या पद्धती, कान स्वच्छ करण्याच्या पद्धती, आदी छोट्या छोट्या पण मोठ्या गोष्टींवर डॉ. भारती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी त्यांनी कानातील मळ काढणे, हाताची स्वच्छता,नखे काढणे, दाताची स्वच्छता आदी प्रात्यक्षिक करून दाखवली व संयोगिता तांबे शिवराज तांबे श्रेयश तांबे चारू पवार प्रतीक्षा तांबे या विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

आरोग्य विषयक माहितीचे काही व्हिडिओज स्क्रीनवर विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सोंडगे सर यांनी केले तर तांदळे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाडेकर मॅडम, राठी मॅडम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या