वनमंत्री साहेब वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई म्हणुन विमा परताव्या इतकी रक्कम द्या - भाई विष्णुपंत घोलप

 


पाटोदा : शिव जागृती न्यूज

 वन्यप्राणी ही आपली राष्ट्रीयसंपती असुन त्यांना जगवण्याची जबाबदारी फक्त शेतकऱ्यावर कशी टाकता येईल.महाराष्ट्रात हरीण,मोर,रानडुक्कर,कोल्हा,वानर,निलगाई(रानगाई) आणि इतर वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे अतोनात नुकसान होत असुन त्यावर सध्या शासनाकडुन तुटपुंजी मदत वनपरीक्षेत्रामार्फत मिळत आहे. उदाहरणादाखल 2022-23 च्या रब्बी हंगामातील पाटोदा तलाठी सज्जातील 7 एकर जमीनीवरील रब्बीचे ज्वारीपीक हरणामुळे संपुर्णतः उदवस्त झाले म्हणजे ते हरणांनी खाऊन टाकले त्या संबंधीत शेतकऱ्यांना 200 रु एकर प्रमाणे 1 हजार 400 रुपयाचा चेक वनपरीक्षेत्र अधिकारी तालुका पाटोदा जि.बीड यांनी शेतकरी शिवाजी बापुराव तांबारे यांना दिला म्हणजे नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्याची एकरी 200 रुपये अनुदान किंवा मदत म्हणून(भरपाई म्हणून) दिली ती राज्याच्या वनमंत्र्यांना योग्य वाटत आहे का? जर नसली वाटत तर आपण शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा वनपरीक्षेत्र कर्मचारी, कृषी विभागाचे कृषि सहाय्यक,महसुल मधील तलाठी यांचा संयुक्त पंचनामा करुन झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्या पिकाच्या परताव्या इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. 

पाटोदा तालुक्यात सध्या रानडुकरामुळे भुईमुग व मका पिक घेणे बंद झालेले असुन रब्बी ज्वारी पिकाचे नुकासन आतोनात झालेले आहे. त्यासाठी वनमंत्री साहेबांनी वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार करुन शेतकऱ्याना नुकसान भरपाई पोटी त्या पिकाच्या विमा परताव्या इतकी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी नसता यापुढे शेतकरी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे  भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप यांनी  लेखी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी कार्यलय पाटोदा तालुका पाटोदा जि.बीड यांच्या मार्फत महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळविले आहे. या वेळी भाई भागवत नागरे, सय्यद मोईज, भाई जमशेद सय्यद, सय्यद रियाज, भाई राजेंद्र जायभाये यांची उपस्थिती होती. माहितीस्तव कृषीमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे ,मा.जिल्हाधिकारी व शेकापचे सरचिटणीस मा.आ.भाई जयंत पाटील यांना कळविले आहे.

टिप्पण्या