★संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहतय तांबाराजुरी गाव
पाटोदा | प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या घोषणा होताच मराठ्यांचे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गावागावांच्या बैठका सुरू झाल्यात प्रत्येक गावामधून उमेदवार देणार आणि मराठ्यांना सगेसोयरे कायदा लागू करणार आणि हक्काचा आरक्षण मिळवणार अन्यथा लोकसभेला प्रत्येक गावातून उमेदवार दिला जाणार असं प्रत्येक गावामध्ये टोकाचं पाऊल उचलताना मराठा समाज दिसत आहे.
पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन लोकसभेला आपल्या गावातील दोन उमेदवार द्यायचे असं निश्चित केले आहे. परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत आहोत त्यांचा आदेश आला तर लगेच रिंगणात उतरणार असेही सांगण्यात आले आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढाईमध्ये झोकून दिला आहे. कोटीने मराठे एकत्र येऊन पाटलांच्या सोबतीला उभे राहिले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सध्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर फिरत आहेत. सरकार गंभीर्याने दखल घ्यायला तयार नाही, यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून लोकसभेला किमान दोन उमेदवार देऊन सरकारला धारेवर धरायचं असं टोकाचे पाऊल मराठा समाजामधून उचललेलं दिसत आहे, परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आदेश पाळणार असल्याचं मराठा समाजामधून बोललं जात आहे. पाटलांचा आदेश आला तर प्रत्येक गावातून दोन उमेदवार आणि नाही आला तर शांत बसू आणि जो मराठ्यांच्या हितासाठी लढला असेल आणि जरांगे पाटील सांगतील त्यालाच मतदान करून निवडून आणू असाही ठाम गाव-गावच्या मराठा समाजांनी निर्धार केला आहे.
पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावातील ग्रामस्थांनी देखील बैठक घेऊन उमेदवार देण्याच निश्चित केलं असले तरी जरांगे पाटलांचा आदेश आला तर उमेदवार उभे करू अन्यथा जरांगे पाटील सांगतील त्याला एक शिक्क्याने मतदान करू आणि निवडून आणू असे देखील एक मुखाने ग्रामस्थांनी ठरवले आहे.
★ दोन उमेदवारांचा लोकवर्गणीतून खर्च!
तांबाराजुरी ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपल्या गावातून दोन उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याच्या संदर्भात बैठक घेतली आहे त्या दोन उमेदवारांचा खर्च लोकवर्गणीतून करण्याचे देखील ठरवण्यात आले असून लवकरच त्यावर अधिकृत निर्णय घेतला जाईल अशी ही माहिती देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा