'तेजस अर्बन'ने सामान्यांची राखली पत; आर्थीक ताळेबंद जाहिर

 


ग्राहकांचा विश्वास जपण्याचा पुर्णत: प्रयत्न: ॲड.प्रकाश कवठेकर

बीड/प्रतिनिधी: 

ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्यास धजावत नाहीत. या लोकांना वेळेत कर्ज देऊन त्यांच्या व्यवसाय उद्योगाला उभारी देण्यासाठी तेजस अर्बन को.ऑप क्रेडिट सोसाइटी सुरू करण्यात आलेली असून सोमवारी तेजसचा आर्थीक ताळेबंद जाहिर करण्यात आला. ३१ मार्च २०२४ अखेर संस्था ५ लाख ४८ हजार रूपये नफ्यात असून ग्राहकांचा विश्वास जपण्याचा पुर्णत: प्रयत्न आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश कवठेकर यांनी केले.

ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील कष्टकऱ्यांना मोठ्या बँका कर्जासाठी दारात उभा करत नाहीत. कागदपत्रांची पुर्तता करताना सामान्यांच्या नाकी नऊ येऊन अनेकदा कर्ज घेण्याचे टाळले जाते. अशावेळी खासगी सावकारांच्या दारातही जाण्याची वेळ येते. अशावेळी सामान्यांसाठी हक्काची बँक असावी,या हेतूने डोंगरकिन्ही गटाचे जिल्हा परिषद सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर यांनी तेजस अर्बन को ऑप क्रेडिट सोसाइटीची स्थापना केली. दिवसेंदिवस ठेवीदारांचा ओघ वाढत असून सोमवारी गेल्या आर्थिक वर्षात मार्च २०२४ अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. पतसंस्थेस ५ लाख ४८ हजार निव्वळ नफा झाला आहे.३१ मार्चला आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा याही वर्षी तेजसने कायम राखली आहे. या वर्षात ठेवी- ७ कोटी २५ लाख, कर्जवाटप-५ कोटी ५६ लाख, गुंतवणूक-१ कोटी २ लाख, निधी-४० लाख, भागभांडवल ७५ लाख, सन्मित्र व्यवसाय-१६५ कोटी ३ लाख,सीडी रेशो-५९.९४ टक्के,नफा-५.४८ लाख रूपये नफा झालेला आहे. सोमवारी आर्थीक ताळेबंद संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश कवठेकर यांनी जाहिर केला. यावेळी संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या