जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबा राजुरी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बबन पवार सर यांची निवड
पाटोदा: प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे मावळते अध्यक्ष संतोष तांबे हे होते.
या पालक सभेचे प्रास्ताविक सोंडगे सर यांनी केले या पालक सभेमध्ये शालेय समितीचे पुनर्गठण, शालेय उपक्रमाचे आयोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली व शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने निवड करण्यात आली.
सर्व पालकांच्या सर्वानुमताने बबन पवार सर यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर अनिल तांबे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निकिता कदम, सुरेखा भंडारे, केशव तांबे, आशा नेमाने, स्वाती तांबे, लक्ष्मण तांबे सर, चंद्रकांत तांबे (ग्रा पं सदस्य) यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी पालकांनी प्रचंड उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली. महिला पालकांची ही उपस्थिती होती . या पालक सभेमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा तांबाराजुरी पाटोदा तालुक्यातील नावाजलेली शाळा होती, या शाळेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करणे माझे उद्दिष्ट असून शाळेमध्ये मागील दोन वर्षापासून विविध उपक्रम राबविले जातात आणि यापुढेही राबविले जातील व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असे मत शालेय व्यवस्थापन समिती चे नवनियुक्त अध्यक्ष बबन पवार सर यांनी मांडले. पालक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पालक सभेत उपस्थित सर्वांचे आभार तांदळे सर यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा