पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.27 रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख श्री बापू मळेकर सर हे होते, मीनाक्षी थोरवे मॅडम (साधन व्यक्ती), गायकवाड मॅडम (सुलभक), संतोष कदम, सतीश अडागळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बबन पवार सर, गणेश तांबे (ग्रा.पं.सदस्य) , केशव तांबे, विकास तांबे,आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री परशुराम सोंडगे सर यांनी केले. तद्नंतर मीनाक्षी थोरवे मॅडम (साधन व्यक्ती), गायकवाड मॅडम (सुलभक), संतोष कदम, सतीश अडागळे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परशुराम सोंडगे सर यांनी केले व श्री अजित तांदळे सर यांनी उपस्थीत सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा