जोमात आलेली पीके, सततच्या पावसाने धोक्यात

 


 तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी -भाई विष्णुपंत घोलप


 पाटोदा : शिव जागृती न्यूज 


 बीड जिल्ह्यात 2024-25 च्या खरीप हंगामाची पेरणी जुनचा दुसरा पंधरवाडा आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जवळपास पुर्ण झाल्या आहेत. त्यानंतर सतत गेल्या 20 दिवसापासुन म्हणजे जवळपास तीन आठवडे सतत काही ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी मोठा पाऊस पडला खरीपाचे पिक उगवल्यानंतर मागील 15 ते 20 दिवस बीड जिल्ह्यात सुर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली,काही ठिकाणी पाणी जास्त झाल्यामुळे पिकाची मुळे सडली तसेच पिके पिवळी पडली आणि पिकावर रोगराई वाढली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना ह्या नुकसानीचा फटका बसला असुन त्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कृषीविभाग,महसुल आणि विमा कंपनी यांना पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना संकटातुन वाचवावे. ई-पीक पाहणीचे सर्व्हर हे 1 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे असे प्रशासनाच्या वतीने मागिल काही दिवसापुर्वी शेतकऱ्यांना कळविले आहे. पाटोदा तालुक्याच्या सर्वच मंडळात खरीप पिकाचे नुकसान झालेले असुन आपण प्रशासनाला पंचनाम्याचे तात्काळ आदेश दिल्यास बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या नुकसानीचा अंदाज येईल असे लेखी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप यांनी कळविले आहे. माहितीस्तव राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री मुंडे साहेब व शेकापचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील आणि बीड जिल्ह्याचे खासदार मा.बजरंग(बप्पा) सोनवणे यांना दिले आहे.

टिप्पण्या