जि.प.प्रा.शाळा पिठ्ठी येथे स्नेहभोजन व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

 



पाटोदा: शिव जागृती न्यूज 

शासनाच्या आदेशानूसार सर्वञ शैक्षणिक सप्ताह साजरा केला जात आहे. आज शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस असल्याने वरिष्ठ स्तरावरून व बीड जि.प.चे कर्तव्य दक्ष शिक्षणाधिकारी श्री भगवानराव फुलारी साहेब यांचे आदेशावरून तसेच बीड जि.प.चे उपशिक्षणाधिकारी श्री ऋषीकेश शेळके साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय बोंदार्डे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जि.प.प्रा.पिठ्ठी शाळेत शिरा,भात,कडीचा समावेश असलेले गोड जेवण विद्यार्थ्याना देण्यांत आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.जेवणा पूर्वी कविता गायन, गीतांच्या भेंड्या,इंग्रजी शब्दांच्या भेंड्या घेण्यांत आल्या. एकंदरीत शालेय वातावरण शिक्षणमय होवून गेले ,विद्यार्थी प्रत्येक कृतीत उत्साहाने सहभागी होत होते.

स्नेह भोजनानंतर शालेय परिसरात वृक्षरोपनाचा कार्यक्रम घेण्यांत आला शालेय परिसरात विध्यार्थ्यांच्या सहकार्याने 70 झाडांची लागवड केली.

यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री नानासाहेब कवठेकर,सरपंच प्रभाकर कवठेकर,शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र राख, श्री शिंदे पी.आर. केंद्रप्रमुख शाळेतील सहकारी शिक्षक श्री भोसले,श्री खाडे,शिक्षीका श्रीमती वर्षा फाटे,उज्वला कुलकर्णी,रोहिणी घाडगे,चित्तरंगा राऊत, शारदा जाधव,पोषण आहार कर्मचारी श्रीमती चंद्रकला कुडके,श्री प्रकाश कुडके यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

टिप्पण्या