आ.भिमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - गणेश शेवाळे
पाटोदा :प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे नेते मा.आ.भिमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वात मोठे आष्टी तालुक्यात दुसऱ्यांदा कृषी प्रदर्शन संपन्न होत आहे.यामध्ये भारतातील सर्वात उंच ५१ लाखाचा सोन्या नावाचा कोसा बैल प्रमुख आकर्षण असणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींसाठी
उद्धव के.पी. प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम
खेळ पैठणीचा, शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला,नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील.यासह बरेच काही असणार आहे. शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासह जिल्ह्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गाने,कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गणेश शेवाळे यांनी केले आहे.आष्टी शहरात मा.आ.भिमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वात मोठे राज्य स्तरीय कृषी प्रदर्शन दि .२९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर कृषी प्रदर्शन सभामंडपात संपन्न होत आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे व लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे,आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.सांगली येथील व देशातील सर्वात उंच ५१ लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत कृषी संबंधित तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येईल व लकी शेतकऱ्यांला शेती उपयोगी भेट वस्तू देण्यात येईल. शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ काढुन विजेत्याला बक्षीस दिले जाईल. कृषी प्रदर्शनात दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अत्याधुनिक मशिन, कुक्कुटपालन माहिती तसेच बॅंके मधून लोन कसे काढायचे यांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला, नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील.आयोजक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी संलग्न श्री छत्रपती,शाहु,फुले, आंबेडकर महाविद्यालय आष्टी आहेत. हे प्रदर्शन मोफत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, व्यावसायिकांनी , नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन गणेश शेवाळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा