बीड- शिव जागृती न्यूज
तणावाचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोलवर परिणाम होतो याचा केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणावामुळे शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
डॉक्टरांच्या मते,ताण घेतल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची (युटीआय) समस्या उभ्दवू शकते. युटीआय एक सामान्य समस्या आहे. जी विशेषतः महिलांमध्ये दिसून येत. तणावामुळे युटीआय ची समस्य उभ्दवू शकते. जेंव्हा आपल्याला काही आव्हान किंवा दबाव येतो तेंव्हा तणावाची समस्या उभ्दवते. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या आर्थिक समस्या इत्यादी कारणांमुळे तणाव येतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
युटीआय म्हणजे मुत्रमार्गाचा संसर्ग, हा संसर्ग बहुतेक जिवाणुंमळे होतो, जे मुत्रमार्गात प्रवेश करतात आणि संसर्ग पसरतात. यूटीआय च्या सामान्य लक्षणामध्ये लघवी करताना जळजळ होणे, लघवी करण्याची वारंवार इच्छा होणे,खालच्या ओटीपोटात दुखणे आणि लघवीला दुर्गंधी येणे याचा समावेश होतो.
तणावामुळे जेंव्हा रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेंव्हा आपले शरीर संक्रमणांशी लढण्यास कमी सक्षम होते.त्यामुळे युटीआय सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. तणावामुळे शरीरात काही हार्मोन्सची पातळी वाढते. ज्यामुळे मुत्रमार्गाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
तणाव कमी करण्यासाठी योग्,ध्यान आणि नियमित व्यायाम करावा तसेच दिवसभर पुरेसे पाणी प्यावे, जेणेकरुन विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढता येतील असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस.,एम.डी.मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गवते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात.
मो.9518551503, 9545615352
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा