【रामकृष्ण बांगर , डॉ . शिवाजी राऊत ,पै.सतीश शिंदे यांच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांना मिळाले हत्तीचे बळ】
आष्टी : शिव जागृती न्यूज
आष्टी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होत असताना प्रामुख्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महबूब शेख यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत असल्याचे दिसत आहे . सहकार महर्षी रामकृष्ण बांगर , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ . शिवाजी राऊत , माजी जिल्हा परिषद सदस्य पै . सतीश आबा शिंदे यांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे . या मातब्बर नेत्यांच्या जाहीर प्रवेशामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार महबूब शेख यांचा विजय निश्चित मानला जात आहे . आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
आष्टी मतदारसंघातील अनेक मातब्बर आणि विविध समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे . शरदचंद्र पवार साहेब यांच्या नुकत्याच झालेल्या आष्टी येथील प्रचार सभेत पाटोदा येथील सहकार महर्षी रामकृष्ण बांगर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ . शिवाजी राऊत यांनी जाहीर प्रवेश केला आहे . बांगर आणि राऊत यांच्या प्रवेशामुळे मतदार संघाची राजकीय गणिते बदलली असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत . तसेच महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ उद्या गुरुवार ( दि . १५ ) रोजी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व खा.निलेश लंके यांची कडा येथे प्रचार सभा होणार असून या सभेत देखील युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य पै.सतीश आबा शिंदे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश होणार असल्याचे उमेदवार महेबूब शेख यांनी सांगितले आहे . आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मातब्बर नेत्यांचा वाढता कौल लक्षात घेता येणारा निकाल प्रस्थापितांना धक्कादायक असेल का अशी चर्चा होऊ लागली आहे . याचप्रमाणे बापुसाहेब डोके , ऍड . नरसिंह जाधव , राम खाडे , आण्णासाहेब चौधरी , सुनील नाथ , डॉ . महेश थोरवे , रवींद्र ढोबळे , अमोल तरटे , परमेश्वर शेळके , शिवभूषण जाधव , दिपक खोले या अनुभवी आणि मातब्बर नेत्यांची फौज महेबूब शेख यांच्या सोबत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा