सुरेश धस हेच शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने शासन दरबारी मांडू शकतात- जयदत्त धस



 

पाटोदा: शिव जागृती न्यूज 

सुरेश धस गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.याच जोरावर तीन वेळा आमदार, तर एकदा राज्यमंत्री असताना मतदारसंघात विकासाची गंगा आणली. सर्व सामान्य जनतेच्या गैरसोयी दुर करून सोयीसुविधाचा लाभ दिला.शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडीकीने शासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम केले. असे मत युवा नेते जयदत्त भैया धस यांनी व्यक्त केले.

231 आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ गाव भेट दौरा निमित्त युवा नेते जयदत्त धस हे तांबा राजुरी येथे आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सुरेश आण्णा यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे केली, मागील काळात वाघाचावाडा प्रकल्प, जेधेवाडी प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले, विद्यमान आमदाराकडून ते प्रकल्प मार्गी लावण्यात अपयश आले असून यासारखे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सुरेश आण्णा धस यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

सुरेश धस हे आता चौथ्यांदा  आमदारकीच्या रिंगणात उतरले असून मोठ्या प्रमाणात गोरगरीब, वंचित, शेतकरी,दीन, दुबळ्या,भटक्या समाजातील लोकांच्या आशिर्वादाने ते निवडणूक लढवत आहेत.मतदारसंघात त्यांना वाढता पाठिंबा मिळत असून शहर, गाव,वस्ती,वाडी,यासह ठिकठिकाणी त्यांचा  बोलबाला आहे.सर्व सामान्य मतदारांनी विजयाचा विडा उचलला असून उद्या लोकप्रतिनिधीं म्हणून मोठ्या मताधिक्याने सुरेश धस याना विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी केला आहे.  महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना कमळ चिन्ह समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन जयदत्त धस यांनी केले. 

यावेळी ॲड.प्रकाश कवठेकर, भाजपा तालुका अध्यक्ष भागवत येवले, माजी सरपंच दीपक तांबे, उपसरपंच विठ्ठल (नाना) तांबे, नवनाथ तांबे, विलास तांबे, सुरेश शिंदे , बबन शिंदे यांच्या सह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या