योगी चा अर्धा उत्तर प्रदेश तर मुंबई पुण्यात - जयंत पाटील





संपूर्ण पाटोदा शहर तुतारी मय..! ही तर महेबूब भाईच्या विजयाची नांदी
 पराभव दिसताच भाजपवाले धर्मावर निवडणूक आणतात-जयंत पाटील

शरद पवारांनी आर आर पाटलांना उपमुख्यमंत्री केलं त्याच धर्तीवर महेबुब शेख यांना उमेदवारी दिली- जयंत पाटील  

आमदारकी ही गुत्तेदार पोसण्यासाठी, दहशत करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी असावी - महेबुब शेख 

पाटोदा : शिव जागृती न्यूज 

महायुतीच्या सरकार ने महाराष्ट्र राज्य देशोधडीला लावला असुन सर्व उद्योग गुजरातमध्ये धाडुन बेरोजगारांचा रोजगार पळवला आहे, कोणत्याही निवडणुकीत भाजपाचा पराभव दृष्टीक्षेपात दिसताच निवडणुक धर्मावर आणली जाते. बटेंगे तो कटेंगे असा व्देष पसरविण्याचे काम चालू आहे. उत्तर प्रदेशचे योगी यांच्याकडून बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला जात आहे त्यांना माझे एकच सांगणे आहे की तुमचा अर्धा उत्तर प्रदेश तर रोजगारासाठी आमच्या  मुंबई पुण्यात आहे. शरदचंद्र पवार हे एक आश्वासक चेहरा असुन पक्षीय बंडात शरद पवारांवर अतुट विश्वास दाखवुन निष्ठा ठेवून कष्ट घेणारे महेबुब शेख या सर्व सामान्य तरुणाला उमेदवारी दिली आहे. आर आर पाटलांनाही अशीच उमेदवारी देऊन उपमुख्यमंत्री पद दिले होते.या साठी प्रामाणिक व निष्ठावंत महेबुब शेख यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटोदा येथील प्रचारसभेत केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारासाठी आष्टी मतदारसंघातील पाटोदा येथील बाजारतळावर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.पक्षाचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत महायुती सरकार वर घणाघाती टीका केली आहे.या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न फारच कमी झाले आहे.तर गुजरातचा नंबर वन आला आहे.शिंदे, फडणवीस,व अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व उद्योग गुजरातमध्ये धाडुन बेरोजगारांचा रोजगार पळवला आहे. देशामध्ये सध्या भाजप व्देषाचे राजकारण करत आहेत.जगातील शास्त्रज्ञ मंगळावर इंटरनेट चालु करण्याची तयारी करतात, अन् हे मात्र भाजपावाले येथे बटेंगे तो कटेंगे करत आहेत.कोणत्याही निवडणुकीत पराभव दृष्टीक्षेपात दिसताच भाजपा निवडणूक धर्मावर आणते.जातीयवादी व धर्मांध लोकांच्या हातुन महाराष्ट्र काढुन घेतला पाहिजे.सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.या निवडणुकीत भाजपाच्या केवळ पन्नास जागा येणार आहेत.शरद पवार यांनी अजित पवारांवर विश्वास दाखवला, तरीही गद्दाराच्या नादी लागून त्यांनी गद्दारी केली आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाने गेल्या वेळेस नवीन चेहऱ्याला संधी दिली, या वेळेसही महेबूब शेख हा नवीन चेहरा दिला आहे, असून आता या निवडणुकीत गद्दारालाही धडा शिकवा असे आवाहन  बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता केले. तसेच मी जलसंपदा मंत्री असताना कुकडीचे पाणी तसेच अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले आहे.महेबुब शेख हा आमदार झाल्यास विधानसभेत गर्जून काम करणार आहे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी महबूब काम करेल.त्यासाठी महेबुब शेख यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांनी आपले मत व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले की,आमदारकी ही जनतेच्या हितासाठी असावी. गावात भांडणे लावण्यासाठी, गुत्तेदार पोसण्यासाठी,दहशत करण्यासाठी,किंवा टक्केवारी खाण्यासाठी आमदारकी नसते.तीस वर्षांपासून प्रस्थापित तीनही आमदाराला साधी एमआयडीसी आणण्याची तसदी घेतली नाही.किंवा एखादा कारखाना उभा करु शकले नाहीत. वाघाचावाडा साठवन तलावाचे काम जयंत पाटील यांच्या काळात झाले. धसपिंपळगाव व पिंपळवंडी परिसरातील राहिलेले अपूर्ण प्रकल्प ही येणाऱ्या काळात पूर्ण करू. पैठण पंढरपूर महामार्गाचे काम अपूर्ण आहे, स्वतः नितीन गडकरी साहेब येथे येऊन गेले, आमच्या डोंगर किन्ही घाटातील काम अपूर्ण आहे. या कामाविषयी यांना आपण सर्वांनी विचारलं पाहिजे. 

मी माझ्या पाच वर्षाच्या आमदारकी च्या काळात मतदारसंघात किमान वीस हजार तरुणाला रोजगार निर्मिती होईल अशी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. हे भाजपवाले म्हणतात की, "हिंदू खतरे मे है" जर खरंच हिंदू खतरे मे है!, तर आंतरवाली सराटी येथे शांत बसलेल्या समाजावर हल्ला केला ते हिंदू नव्हते का?आमच्या आया बहिणीचे डोके फोडली, त्यावेळेस हिंदू धोक्यात नव्हता का? असा सवाल यावेळी महेबूब शेख यांनी केला.

या प्रचारसभेत गणेश कवडे, ता.अध्यक्ष शिवभुषण जाधव,माजी सभापती आनंद जाधव, ॲड नरसिंग जाधव माजी जि प अध्यक्ष डॉ शिवाजी राऊत,सतिष आबा शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते , माजी आमदार उषाताई दराडे , महादेव नागरगोजे यांची भाषणे झाली.

यावेळी मंचावर आण्णासाहेब चौधरी,अमोल तरटे,राम खाडे, विष्णुपंत घोलप, शिवाजी सुरवसे,राहुल जाधव, मुकुंद शिंदे,गुलाब घुमरे, बापुसाहेब जावळे,अमोल चव्हाण, ॲड अंकुश कांबळे, माऊली लवांडे, सुनिल काळेसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मतदार बंधू-भगिनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन ॲड सय्यद वहाब यांनी केले.

*आनंद जाधव यांच्या प्रवेशाने भाजप ला धक्का*

   भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांना जयंत पाटील यांनी पाटोदा येथिल सभेत धक्का दिला आहे.आ सुरेश धस यांचे कट्टर समर्थक पाटोदा पंचायत समितीचे सभापती आनंद जाधव यांनी दोनशे तरुणासह जाहीर प्रवेश केला तर याच सभेत डोंगरकिन्ही येथिल युवा सरपंच आण्णासाहेब येवले,माजी पंचायत समिती सदस्य विद्याधर येवले,माजी उपसभापती विक्रम म्हस्के यांनी ही प्रवेश करुन आ सुरेश धस यांना धक्का दिला आहे.

टिप्पण्या