आष्टी : शिव जागृती न्यूज
आष्टी विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी ४४० मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये ३ लाख ८६ हजार ३५८ इतक्या एकूण मतदारांपैकी २ लाख ८१ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे सरासरी ७२.९६ % सरासरी मतदान झाले.
यापैकी पुरुष २ लाख ५ हजार ३५६ पैकी १ लाख ५१ हजार ८२१ इतक्या पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर १ लाख ८१ हजार १ पैकी १ लाख ३ हजार ६६ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हणजे शनिवार दि.२३/११/२०२४ रोजी मतमोजणी होऊन विजयी उमेदवार घोषित केला जाईल तो या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असेल. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी वसीमा शेख तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वैशाली पाटील यांच्यासह नायब तहसीलदार यांच्यासह त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पाण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. आता उत्सुकता आहे ती निकालाची कारण अनेकांनी पैजेचे विडे उचललेले आहेत. त्यामुळे कोण जिंकणार कोण हरणार याचे तर्क लावले जात आहेत. मात्र दोन दिवस याची प्रत्यक्ष करावी लागणार हे नक्की. अशाप्रकारे आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया उत्साही वातावरणात पार पडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा