शेतकऱ्यांनी मागणी केलेला ट्रान्सफॉर्मर काही तासात बसवल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद
आष्टी : शिव जागृती न्यूज
कडा येथील महावितरणच्या ३३ के. व्ही वीज उपकेंद्रातील ०५ मेगा व्होल्ट अँम्पियर क्षमतेचे जनित्र (ट्रान्सफॉर्मर) दि.५ सप्टेंबर रोजी जळाल्याने कडा परिसरातील आठ ते दहा गावांचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.
दोन दिवसांपूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली असता याबाबीची तत्परतेने दखल घेत आ. सुरेश धस यांनी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांना दूरध्वनी वरून संपर्क करत तात्काळ ट्रान्सफार्मर देण्याची मागणी करताच सातारा येथे उपलब्ध असलेला ट्रान्सफॉर्मर मागविला असून तो आज बसविण्यात आला असल्याने अनेक गावांचा ऐन रब्बी हंगामातील विजेचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करून दबंग आमदार सुरेश धस यांच्या नावाच्या जयघोष करत नेता असावा तर असा. आ. सुरेश धस म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणत त्यांचे अभिनंदन करत स्वागत केले.
शनिवारी ट्रान्सफॉर्मर कडा ३३ के. व्ही उपकेंद्रात दाखल झाला. त्याची विधिवत पूजा करताना सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच अनिल ढोबळे , उपसरपंच दिपक कर्डीले ,सचिन घावटे ,अन्सार सय्यद ,सुभाष ढोबळे , भाऊसाहेब भोजने , महेश घोलप ,अभिजित ढोबळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित दिसत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा