पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील पत्रकारांनी शहरातील अनेक समस्याच्या मागण्या वेळोवेळी सत्ताधारीसह विरोधी पक्षाच्या नेत्यांसमोर मांडल्या पंरतु कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही. या विधानसभा निवडणुकीत पत्रकारांच्या समस्यांना गांभीर्याने विचार न करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषद पाटोदा तालुका अध्यक्ष प्रा अजय जोशी यांनी केले आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जनतेची भूमिका मांडण्यात पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, आदी आपापले प्रश्न पत्रकार यांच्या माध्यमातून सरकारकडे मांडतात. त्याचप्रमाणे पत्रकारांनाही काही अडचणी प्रश्न समस्या आहेत.
पाटोदा शहरात पत्रकार भवन निर्माण करावे,सोलापूरच्या धर्तीवर शहरात पत्रकार वसाहत निर्माण करावी, पत्रकारांच्या संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारावर हल्ला करण्यावर कठोर कारवाई करावी, यासह अन्य काही मागण्या आहेत जसे की,
पाटोदा शहरात उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी,बीड ते पुणे, मुंबई (चुंबळी फाटा) मार्गे जाणाऱ्या सर्व बसेस पाटोदा मार्गे सोडण्यात याव्यात,बसस्थानकात रात्रीच्या वेळी कंट्रोलरची नेमणुक करावी,या सह विविध सर्व मागण्यांना समर्थन करणाऱ्या पक्षास पत्रकारांनी पसंती द्यावी व आपले मतदान करावे. कसे आवाहन प्रा.अजय जोशी यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा