पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा पं. स. माजी सभापती गोवर्धन सानप यांचा मृतदेह सौताडा येथे आढळून आला आहे. मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह सौताडा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाल्याचे कळते. काही वर्षांपूर्वी त्यांनी पाटोदा पंचायत समितीचे सभापती पद भूषवले होते. मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. सानप यांनी (suicide) आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याचा शोध पोलीस (police) घेत आहेत.
गोळीबाराच्या चर्चा पण....
गोवर्धन सानप (sanap) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या चर्चा होत्या. (beed police) पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी मिडियाशी बोलताना मात्र गोवर्धन सानप यांची हत्या झाली नसल्याचे सांगितले असून गोळीबाराच्या अफ़वा आहेत असे स्पष्ट केले. पोलीस घटनास्थळी दाखल असून मृतदेहाची तपासणी केल्यानंतरच खरे कारण समोर येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा