पाटोद्यात शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांची जाहीर सभा


पाटोद्यात कोणत्या पक्षाला पडणार भगदाड चर्चा जोरात

पाटोदा : शिव जागृती न्यूज 

महाविकास आघाडीचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ उद्या  दि १६ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ९.३० वाजता पाटोदा येथील बाजार तळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांची जाहीर सभा होणार असून या सभेस खा बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव यांनी केले आहे.

आष्टी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून युवक व सर्व सामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदरील निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याने महेबुब शेख यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पाटोदा येथे उद्या शनिवार सकाळी ९.३० वाजता बाजार तळ येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून खा. बजरंग सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे.आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला , शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*उद्या कोणत्या पक्षाला भगदाड पडणार याकडे लक्ष*

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आत्तापर्यंत आष्टी मतदारसंघात दोन सभा होत झाल्या असून यामध्ये प्रामुख्याने मा.जि.प.अध्यक्ष डॉ शिवाजी राऊत,सहकार महर्षी रामकृष्ण बांगर,तर दि.१५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवानेतृव तरूणाईच्या गळ्यातील ताईत मा.जि.प.सदस्य सतिष आबा शिंदे प्रवेश करणार असल्याने उद्या होत असलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जाहिर सभेतून कोणत्या पक्षाला भगदाड पडणार यांची चर्चा सध्या मतदारसंघातुन करण्यात येत आहे.

टिप्पण्या