सामुहिक उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईत.?
तुळजापुर : शिव जागृती न्यूज
सगळ्याच आमदारांना मराठ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळं सगळ्यानांच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
ओबीसींच्या आमदारांना देखील मराठ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळं सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. नसेल तर आमदारांना पुन्हा त्या मतदारसंघात जायचं आहे, त्यामुळं त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढचं सामुहिक उपोषण होणार आहे. ते उपोषण अंतरवाली सराटीत होईल किंवा मुंबईतही होऊ शकतं असे जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच
राजकारण हे आमचं क्षेत्र नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यामध्ये मला पडायचं नाही असे जरांगे पाटील म्हणाले. सरकार स्थापन झाल्यानंतर सामुहिक उपोषनाला बसणार आहे. हे उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईतही होऊ शकतं असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, तुळजा भवानीच्या चरणी मागणं..
माझ्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे आशिर्वाद मिळू दे हेच मागणं तुळजाभवानी मातेकडे मागितल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी केली देवदर्शन दौऱ्याला सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांनी आज देवदर्शन दौऱ्याला सुरुवात केली. सकाळी ते 9 वाजता अंतरवाली सराटीतून हजारो गाड्यांच्या ताफ्यासह निघाले होते. मनोज जरांगे यांनी तुळजापुरात कुलस्वामिनी तुळजा भवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, तुळजा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील हे लगेच पंढरपूर इथं विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. पंढरपूर येथून दर्शन झाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीला जाणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा