बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ.सुरेश धस यांना मंत्री पद द्यावे - राजु भैया जाधव


 

देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली मागणी 

पाटोदा: शिव जागृती न्यूज 

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे व बीड उस्मानाबाद लातूर विधानपरिषद असे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार सुरेश धस या वेळी देखील ७८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. विकासाची जान असलेल्या सुरेश अण्णां धस यांना सर्वांगीण विकासासाठी आगामी मंत्रिमंडळात मंत्रिपद द्यावे, अशी मागणी  दि. 4 रोजी मुंबई येथे श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री सुरेश (आण्णा) धस यांच्या माध्यमातून देण्यात यावे अशी विनंती व शिफारस केली, नगराध्यक्ष श्री राजू (भैय्या) जाधव,सौ.दिपाली (राजूभैय्या) जाधव यांनी केली. 

पाच वेळा आमदार म्हणून काम करत असताना आ.धस यांनी सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून सतत विकासाची कामे केली आहेत. त्यामुळेच जनतेने त्यांना निवडून दिले असून, महसूल राज्यमंत्री व रोजगार हमी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री असताना मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. अनुभवातून अनेक वेळा सभागृहात शेतकरी, कष्टकरी, शिक्षण आरोग्य सिंचनासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. सर्वसामान्यांचे हित जपणारा व सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्यात सुरेश आण्णा धस यांची ओळख आहे अशा लोकप्रतिनिधीला कॅबिनेट मंत्रीपद देऊन विकासाची गंगा जिल्ह्यात आणण्यासाठी मंत्रीपद द्यावे अशी मागणी दि. 4 रोजी मुंबई येथे श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री सुरेश (आण्णा) धस यांच्या माध्यमातून देण्यात यावे अशी विनंती व शिफारस केली, नगराध्यक्ष श्री राजू (भैय्या) जाधव ,सौ.दिपाली (राजूभैय्या) जाधव यांनी केली. यावेळी शिरूरचे नगराध्यक्ष श्री रोहिदास गाडेकर,श्री गणेश भांडेकर हे उपस्थीत होते.

टिप्पण्या