पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नैराश्य अधिक-डॉ.जगदीश टेकाळे


 

बीड-  शिव जागृती न्यूज 

नैराश्य हा एक प्रकारचा मनोविकार असुन जो कोणत्याही वर्गाच्या लोकांना प्रभावित करु शकतो. तथापि, पुरुषांपेक्षा स्त्रियांना सामान्यतः नैराश्याने जास्त प्रभावित केले आहे. आजचा धकाधकीचा काळ जितका पुरुषांसाठी तितकाच महिलांसाठीही त्रासदायक आहे. अशा स्थितीत विश्रांतीचा अभाव,इतरांच्या गरजा स्वतःवर टाकून आणि सदैव अपेक्षेप्रमाणे जगणे,यामुळे आज स्त्री ही नैराश्याच्या गर्तेत झोकली जाते. 

याशिवाय जैविक,हार्मोनल कारणे आणि सामाजिक दबावदेखील नैराश्याला प्रोत्साहन देतात. मग काही स्त्रिया त्यांचे करिअर धोक्यात आल्यावर किंवा मुलांच्या जन्मानंतरही तणावामुळे नैराश्यात जातात. विशेषतः महिलांमध्ये नैराश्य निर्माण करणारी अनेक कारणे आहेत. बहुतेक महिलांना हे सुध्दा माहित नसते की आपण नैराश्याच्या बळी होत आहोत.

चिडचिड होणे, थकवा जाणवणे,कामात अनास्था, झोपेचा अभाव/निद्रानाश, वजन कमी होणे किंवा वाढणे, भूक वाढणे/घटणे, नकारात्मक विचार, आरोग्याकडे दुर्लक्ष आदी कारणांमुळे नैराश्य उदभवते असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गावते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. मो.9518551503, 9545615352

टिप्पण्या