माजी महसूल राज्यमंत्री आ. सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त 2500 स्कूल बॅगचे वाटप.- राजु भैया जाधव


 इन्फंट इंडिया येथील विद्यार्थ्यांना भोजन व गोशाळेला चारा वाटप

पाटोदा: शिव जागृती न्यूज 

महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री आ सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे विविध सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे असे आयोजक  नगराध्यक्ष राजु भैया जाधव यांनी माहिती देवून उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

माजी महसूल राज्यमंत्री आ सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे दि १ रोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 2500 स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. इन्फ्रंट इंडिया, पाली येथील विद्यार्थ्यांना भोजन तसेच गोशालेला चारा व पत्रे वाटप, पंतप्रधान आवास योजना शुभारंभ (शहरी 2.0) आदी कार्यक्रमाचे आयोजन  हायस्कूल शाळा पाटोदा येथे शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे.

मा. सागर आप्पा धस युवा नेते यांच्या शुभहस्ते पाटोदा शहर व पाटोदा नगरपंचायत हद्दीतील 5 वाड्या आणि वस्त्यावरील जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना 2500 स्कूल बॅग चे वाटप करण्यात येणार आहे.

गोशाळेत पशुंसाठी चारा व पशुंच्या निवाऱ्यासाठी पत्रे वाटप, बारगजे सर यांच्या इन्फंट इंडिया पाली येथील विद्यार्थ्यांना भोजन, पंतप्रधान घरकुल आवास योजना (शहरी 2.0) शुभारंभ असे आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, गणप्रमुख गटप्रमुख, नगरपंचायत उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती, सर्व नगरसेवक, माझी माझी पदाधिकारी शिक्षक व मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती असून आपण सर्वांनी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष राजु भैया जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या