जास्त झोप ठरु शकते मेंदू व हृदयासाठी हानिकारक-डॉ.जगदीश टेकाळे



बीड- शिव जागृती न्यूज 

 पुरेशी व गाढ झोप तन मनाच्या आरोग्य व विश्रांतीसाठी गरजेची असते. मात्र, अनेकांना जास्त प्रमाणात झोप घेण्याची सवय असते जी हानिकारक ठरु शकते, असे तज्ज्ञ सांगतात. दहा तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, अतिझोपेमुळे मेंदूचे कार्य मंदावते व नैराश्य देखील निर्माण होते. 

वजन वाढणे,डायबेटिससारख्या विकारांचा धोका निर्माण होतो. वयानुसार झोपेचे योग्य प्रमाण असे, 0 ते 5 वर्षे- 10-14 तास, 6 ते 12 वर्षे- 9-11 तास,13 ते 17 वर्षे- 8-10 तास,प्रौढ(18 वर्षे व त्यापुढील) ः 7 - 9 तास,वयाच्या 13 वर्षानंतर 7 ते 9 तासांची झोप पुरेशी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. जास्त झोप घेतल्याने शारिरीक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता वाढते असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. 

डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गवते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. 

मो.9518551503, 9545615352

टिप्पण्या