होय व्यसनमुक्ती शक्य आहे – डॉ.जगदीश टेकाळे


 होय व्यसनमुक्ती शक्य आहे – डॉ.जगदीश टेकाळे 

व्यसन म्हणजे काय?

✳व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी एखादी सवय जिच्यामुळे संबंधित व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान होत असूनही आपल्या त्या सवयीत बदल करणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही.

*✳दारू ही शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. दारू मुळे अनेकांचे संसार, घर बरबाद झालेले आपण पाहतो. त्याच बरोबर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेलं आहे. किडन्या फेल होणं, लिव्हर खराब होणं हे सुद्धा दारूच्या अति सेवनाने होतं.

अनेकाची लिव्हर खराब झाल्याने त्यांचा मृत्यु होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे.

✳ व्यसनांचे परिणाम ➡

कोणत्याही प्रकारच्या व्यसनांचे शरीरावर दुष्परिणाम होतातच. हे परिणाम शारीरिक तर असतातच, पण मानसिक, व्यवहारीक आणि सामाजिक देखील होतात. 

♦ व्यसनांमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम

सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग  व इतर भयंकर रोग होतात. अनेक व्यसनी रुग्णांना डायलिसिस करावे लागते.

♦व्यसनांमुळे होणारे मानसिक दुष्परिणाम

व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय.

व्यसन म्हणजे मानसिक आरोग्याला लागलेले खग्रास ग्रहण असते. यामध्ये चिंता, नैराश्य, विस्मरण होणे, स्मृतिभ्रंश हे त्रास होतातच. पण आनंद आणि दुःखाचे हिंदोळे वेगाने बदलणारे ’मूड स्विन्ग्ज’ या व्यक्तीत  प्रकर्षाने आढळून येतात. आक्रमकता आणि गुन्हेगारी वृत्ती वाढते, संशयी वृत्ती हा व्यसनांचा परिपाक असतो आणि मानसिक आरोग्याचा ऱ्हास होऊन निरोगी व्यक्तीचे मानसिक रुग्णात रुपांतर होते.

♦व्यसनांमुळे होणारे व्यवहारीक  दुष्परिणाम

दैनंदिन जीवनात उद्भवणार्या समस्यांची काही उदाहरणे, उदा. परिक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाले तर पती-पत्नीचे न पटणे,  धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्भवतात.

♦व्यसनांमुळे होणारे सामाजिक  दुष्परिणाम

व्यसन करण्यासाठी इष्ट-अनिष्ट, योग्य-अयोग्य, अनैतिक, पाप, चोरी, मानवतेला काळिमा फासणाऱ्या गोष्टी... काय वाटेल ते करण्याची मनाची तयारी होते. ती व्यक्ती त्या सवयीच्या पूर्ण आहारी जाते, त्या सवयीचा एकनिष्ठ गुलाम बनते. यामुळे समाजात त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

♦प्रत्येक व्यसनी व्यक्ती हा चांगलाच असतो पण आपल्याला व्यसनामुळे फक्त त्याच्या वागण्यात बदल दिसत असतो.. 

✳दारू ही शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. दारू मुळे अनेकांचे संसार, घर बरबाद झालेले आपण पाहतो. त्याच बरोबर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेलं आहे. किडन्या फेल होणं, लिव्हर खराब होणं हे सुद्धा दारूच्या अति सेवनाने होतं.

अनेकाची लिव्हर खराब झाल्याने त्यांचा मृत्यु होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे.

व्यसनमुक्ती उपचार

डीटॉक्सिफिकेशन : 

व्यसनापासून मुक्त करताना रुग्णाच्या शरीरात भिनलेला व्यसनाच्या पदार्थाचा, द्रवाचा, रसायनाचा किंवा तत्सम गोष्टींचा अंश शरीरातून नाहीसा करणे, ही सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट असते.

कौटुंबिक पाठबळ :

 व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबीयांनी व्यसनी व्यक्तीशी कसे वागावे, काय सांगावे याबाबत मार्गदर्शन केल्यास अनेक व्यसनी व्यक्तींची व्यसने सुटू शकतात. 

असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गावते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. मो.9518551503, 9545615352

टिप्पण्या