शिव जागृती न्यूज
बीड येथील तेजस ग्रुपचे चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड प्रकाश दादा कवठेकर यांना माता सावित्री / फातिमा सार्वजनिक वाचनालय कुर्ला ( पूर्व ) मुंबई यांच्या वतीने माता सावित्री / फातिमा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, बीड येथील उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमवलेले व मनमिळावू स्वभाव गरजूंना मदतीचा ध्यास सामाजिक कार्याची आवड आणि आदर्श व्यक्तिमत्व या गुणामुळे ॲड प्रकाश दादा कवठेकर यांनी अल्पावधीतच जनमानसात ठसा उटवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःच्या हिमतीवर प्रगती करून युवकासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. स्वतः नोकरी न करता व्यवसायामध्ये तेजस इलेक्ट्रिकल च्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली आणि आज ऑक्सितेज मिनरल वॉटर, तेजस प्रोडक्शन कंपनी, तेजस अर्थमूव्हर्स, तेजस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तेजस डिजिटल मार्केटिंग आदी, या उपक्रमाद्वारे आणि आपल्या सामाजिक बांधिलकी जपत कायम आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल वाचनालयाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून हा पुरस्कार सोहळा दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता माननीय बाळासाहेब ठाकरे समाज केंद्र नेहरूनगर कुर्ला (पूर्व) मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा