पाटोदा:शिव जागृती न्यूज
केंद्रीय कामगार मंत्रालयाने ई श्रम पोर्टल सुरू केले आहे . या पोर्टल च्या माध्यमातून देशातील जवळपास 38 कोटी असंघठीत कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . यात सर्व प्रकारच्या असंघठीत कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे . यात प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रातील कामगार , स्थलांतरीत मजूर , फेरीवाले मजूर , घर कामगार , शेती कामगार व इतर सर्व प्रकारच्या असंघठीत कामगारांची नोंदणी सी.एस.सी. च्या माध्यमातून करता येणार आहे . या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या वतीने 2 लक्ष रू.विमाकवच मिळणार आहे . अपघातात कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लक्ष रू.ची भरपाई सरकारच्या वतीने देण्यात
येणार आहे . पोर्टलवर नोंदणी झालेल्या कामगारास 12 अंकी यूनिक नंबर असलेले श्रम कार्ड मिळणार आहे . या योजनेत नाव नोंदणीसाठीची वयोमर्यादा 16 ते 59 वर्ष असुन या वयोगटातील मजूरांनी सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी श्री साई कॉम्प्युटर्स बस स्टँड रोड पाटोदा मो.9284334877 प्रा.बबन पवार सर यांच्या शी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा