तळेपिंपळगावच्या दुर्गेश धसे यांचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते गौरव


 

पाटोदा : शिव जागृती न्यूज 

पाटोदा तालुक्यातील तळे पिंपळगावच्या दुर्गेश मुकुंद धसे यांनी सामवेद घनपाठी ही दुर्मिळ पदवी मिळवून पाटोदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल रविवारी दुपारी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते अद्वैतचंद्र या निवासस्थानी गुणगौरव करण्यात आला. 

पुण्यातील वेदशाळेत सलग दहा वर्षे कठोर प्रशिक्षण घेत त्याने सामवेदाच्या गहन शाखेचा सखोल अभ्यास केला. भारतभर मर्यादित संख्येने मिळणाऱ्या या पदवीमध्ये आता दुर्गेशचे नाव समाविष्ट झाले आहे. त्याच्या या साधनेसाठी आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचारात योगदानाबद्दल त्याला ।' श्री सत्य साई भारत संस्कृती सन्मान २०२५' अंतर्गत अनुत्तम वेद विद्यार्थी हा बहुमान मिळाला. हा सन्मान ८ जुलै २०२५ रोजी बंगळुरू येथे झालेल्या समारंभात श्रीलंकेतील अध्यात्मिक गुरु थेरू आणि सदुगुरु मधुसूदन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

 यावेळी तळेपिंपळगावचे सरपंच शशिकांत चौरे, श्रीकांत धसे, विनायक पांडव, किरण चौरे, गोकुळ डीसले, वाघ सर, गणेश दळवी, राहुल गाडे, रवी राऊत, विनोद चौरे, अशोक घाडगे आदी तळेपिंपळगाव, वाघाचा वाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या