दीपक दादा घुमरे यांच्या पुढाकाराने पारगाव जिल्हा परिषद गटातील दासखेड येथे “लाडक्या बहिण योजनेचे मोफत KYC” शिबीर उत्साहात पार पडले


पाटोदा (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गटाचे) माजी आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने पारगाव जिल्हा परिषद गटातील दासखेड येथे “लाडक्या बहिण योजनेचे मोफत KYC शिबीर” उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले.या उपक्रमाचे आयोजक दीपक दादा घुमरे होते. त्यांच्या पुढाकाराने आणि सुयोग्य नियोजनामुळे हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे पार पडला. ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अडथळे दूर व्हावेत, हा दादांचा हेतू असल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा मोफत KYC उपक्रम राबवला. शिबिरामध्ये परिसरातील शेकडो महिलांनी सहभागी होऊन “लाडक्या बहिण” योजनेचा लाभ घेतला. महिलांनी ऑनलाईन KYC प्रक्रिया पूर्ण करून आपल्या नावावरून मिळणाऱ्या शासकीय लाभांसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुलभ केली.शिबिरादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. उपस्थितांना शासनाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली तसेच पुढील काळात अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

दीपक दादा घुमरे यांनी सांगितले की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना शासनाच्या योजना सहज उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. दासखेड येथील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या शिबिराचे खरे यश आहे.” या यशस्वी आयोजनामुळे  शिवाजीराव कोकाटे, तात्यासाहेब कोकाटे, युवराज कोकाटे, अविनाश पवार, शेलार गणेश, विवेक कोकटे, अमोल कोकाटे, केशव ठाकूर ,गणेश वाघ आदी सह ग्रामस्थ आणि नागरिकांनी दीपक दादा घुमरे यांच्या सामाजिक कार्याचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे.

टिप्पण्या