पाटोदा *(गणेश शेवाळे)* बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व आगामी येणाऱ्या बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती,नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्य जास्तीतजास्त निवडून आले पाहिजे. त्याकरिता जिद्दीने व एकीने काम करा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली पाहिजे 2024 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येऊन महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपसातले हेवेदावे विसरून एकजुटीने राहून राज्यात पक्षवाढीसाठी काम करावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी राज्यभर काढलेल्या संवाद यात्रा 27,28 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यात येणार असून या संवाद याञेला बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा घुमरे यांनी केले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा