डॉ.लक्ष्मण बापूराव तांबे यांची पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 पदी निवड



पाटोदा: शिव जागृती न्यूज

पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील सामान्य कुटुंबातील डॉ.लक्ष्मण बापूराव तांबे यांची एमपीएससी मार्फत पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 पदी निवड झाली आहे.या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व मित्र परिवार आणि तालुक्यातील परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माध्यमिक विद्यालय तांबाराजुरी शाळेचे माजी विद्यार्थी, उंबरविहीरा येथील सामान्य कुटुंबातील होतकरू , गुणवंत व विनम्र मुलगा आज मोठा अधिकारी झाला आहे.  शाळेच्या अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा, शिक्षण संस्थेचा आणि आपल्या परिसराचा मोठा नावलौकिक केला आहे. या विशेष कौतुकास्पद यशाबद्दल डॉ. लक्ष्मण तांबे यांचे तांबाराजुरी हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी, शिक्षण संस्थेचे प्रमुख, तांबा राजुरी गावचे सरपंच दिपकराव तांबे, उंबरविहिरा गावचे सरपंच अशोक देवकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा देऊन  कौतुक सुद्धा केले आहे.

शिव जागृती न्यूज परिवारातर्फे ही डॉ.लक्ष्मण बापूराव तांबे यांचे अभिनंदन व त्यांच्याकडून वेळोवेळी आपल्या परिसरातील नवयुवकांना तरुणांना मार्गदर्शन मिळेल.एमपीएससी चा अभ्यास करणारे होतकरू मुले त्यांची प्रेरणा घेऊन अधिक जोमाने अभ्यास करून येणाऱ्या काळात अनेक पदावर विराजमान होतील. अशी मला आशा आहे.

प्रा. बबन पवार सर

टिप्पण्या