पाटोदा : शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुका हा टर्निंग पॉइंट म्हणून उदयाला आला आहे त्यामध्ये अनेक युवकांनी आपलं नशीब देखीला जमवला आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उदयाला आलेले युवक चांगल्या चांगल्या पदावर जाऊन बसले आहेत तशाच पद्धतीने पाटोदा शहरांमध्ये नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी आग्रही असणारे राहुल बामदळे हे सध्या चर्चेत आहेत मग प्रश्न कोणताही असो त्या ठिकाणी राहुल बामदळे हे उभे असणारच यात तिळमात्र शंका नाही अशा या चळवळीतील युवकांना न्याय मिळणार का हे पाहावे लागेल.
पाटोदा तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा , वांळू भरण्यापासून ते नगरपंचायत मधून जनतेच्या घरकुलच्या प्रश्न पर्यंत सर्वच प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला छोट्या-मोठ्या ठिणगी टाकत मोठमोठे विषय तयार करणारे राहुल बामदळे हे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे युवा नेते म्हणून उदयाला आले आहेत.आत्ताच त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस जिल्ह्याचे पद आल्याने नागरिकांना त्यांच्याकडून अधिक अपेक्षा वाढल्या आहेत मराठा क्रांती मोर्चा मध्ये युवकांना एकत्रित करून आवाज उठवणारे त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेमधून वृद्धांना पगार सुरू करण्यापासून जनतेला केलेले सहकार्य पिकांचे झालेले नुकसान त्यांचे पंचनामे करण्यासाठी केलेला प्रयत्न मराठा आरक्षणाचं जात प्रमाणपत्र पिक कर्ज मिळण्यासाठी केलेल्या आंदोलन आरोग्यासाठी फवारणीसाठी वेळ वारंवार आरोग्य अधिकाऱ्यांना सांगून फवारणी करून घेण्यापर्यंत अशा विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान अशी त्यांना उपमा दिली तरीही वेगळा ठरणार नाही कारण की राहुल बामदळे हे मूर्तीने लहान असले तरी कीर्तीने खूप मोठे आहेत त्यांच्या या वेगळेपणामुळे युवकांनाही ते आपलेसे वाटू लागले आहेत. त्यांच्या या सुरू असलेल्या चळवळीला कुठेतरी न्याय मिळेल का अशीच चर्चा पाटोदा तालुक्यामध्ये सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा