पाटोदा: शिव जागृती न्यूज
'भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्थ अभिमान आहे!' असे गौरवोद्गार मराठवाडा रहिवाशी संघाचे संस्थापक अध्यक्ष रुपेश राजे बेद्रे पाटील यांनी काढले.
भारतीय नौसेना दिनाच्या निमित्ताने राष्ट्रभक्ती, देशप्रेम आणि मातृभूमीच्या संरक्षणासाठी भारतातील प्रत्येक व्यक्तीने आपले योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून रुपेश राजे बेद्रे पाटील पुढे म्हणाले, देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक भारतातील नौदलातील जवानांचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे.
तसेच मराठवाडा रहिवाशी संघाच्या वतीने भारतीय नौदलाच्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
----------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा