शिव जागृती न्यूज
काही दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य सेवक भरतीमध्ये जो काही गैरकारभार झाला, त्या प्रकारात MPSC समन्वय समितीने लक्ष घालून सर्व गैरप्रकार उजेडात आणला आणि ही मोठी आरोग्य विभागातील मेगा भरती शासनाला रद्द करण्यास भाग पाडले आणि तसे पत्र काल राज्यशासनाने काढले त्याबद्दल सामान्य गोरगरीब जनतेच्या मुलांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात जागा ह्या पैसे भरून भरण्यात येणार होत्या.
पाटोदा तालुक्याचे भूमिपुत्र राहुलजी कवठेकर सर आणि त्यांची MPSC समन्वय टीम यांनी उजेडात आणून भरती प्रक्रियाच पुन्हा नव्याने घेण्यासाठी भाग पाडले त्याबद्दल समस्त गोरगरीब मुलांकडून राहुलजी कवठेकर सर आणि MPSC समन्वय टीम चे आणि ठाकरे सरकारचे आभार मानण्यात येत आहेत.
आता नव्याने भरती झाल्यावर खऱ्या गुणवत्ता धारकांना न्याय मिळेल. त्यामुळे सर्व सामाजिक स्तरातून राहुलजी कवठेकर सर आणि MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानण्यात येत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा