बीड- शिव जागृती न्यूज नेटवर्क
जास्त ‘स्क्रीन टाइम’ मुलांच्या हृदयावर आणि मनावर परिणाम करत आहे.तसेच ‘स्क्रीन टाइम’ वाढणे हे मुलांसाठी त्रासदासक ठरु शकते. याचा मेंदूवरच परिणाम होत नाही तर मुलांच्या वागणुकीवरही परिणाम होतो, असे अभ्यासात समोर आले आहे.
जागतिक ‘मानसिक आरोग्य दिना’ निमित्त प्रसिध्द झालेल्या अभ्यासात काही धोके स्पष्ट करण्यात आले आहेत. मुले रागीट आणि चिडचिडी होत आहेत. त्यांच्यात आक्रमकता, नैराश्य आणि चिंता विकार यासारख्या वर्तणुकीच्या समस्या अलीकडच्या काळात लक्षणीय वाढल्या आहेत. या वर्तणुकीशी संबंधित समस्यांमध्ये अचानक मूड बदलणे आणि मुलांच्या भावनामध्ये तीव्र बदल यांचा समावेश होतो. आक्रमकता वाढली तर विनाकारण चिडचिड आणि राग येऊ लागतो. अशा मुलांना मूड बदलणे, डोकेदुखी किंवा शरीर दुखणे, आवेग, अतिक्रियाशीलता आणि निष्काळजीपणा अनुभवण्याची शक्यता असते, या लक्षणांमध्ये खराब शैक्षणिक कामगिरीचा समावेश आहे.
खाण्यापिण्याच्या किंवा झोपण्याच्या पध्दतीमध्ये बदल, जसे की भूक न लागणे किंवा झोप न लागणे हे देखील अंतर्गत समस्यांचे लक्ष्मण असू शकते. याशिवाय काही मुले अंथरुन ओले करतात किंवा अंगठा चोखणे इत्यादी प्रतिगामी वर्तन देखील दर्शवू शकतात हे संकटाचे लक्षण असू शकते.
पालकांनी संयम बाळगावा. त्यांना मारु नये, ओरडणे किंवा अपमानास्पद पध्दतीने बोलणे टाळावे असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.मुलांशी बोलताना त्यांना काय त्रास होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ग्रामीण भागात देखील हि समस्या उद्भवत आहे असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गावते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. मो.9518551503, 9545615352

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा