कसलाही आरडाओरडा न करता, अठरापगड जाती धर्मातील लोकांच्या मनावर कामातून राज्य करणारे आ.बाळासाहेब आजबे काका


 जनताच म्हणते पुन्हा आमदार तर काकाच होणार

पाटोदा |शिव जागृती न्यूज 

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दलित बांधवांच्या मदतीला नव्हे तर अठरापगड जाती धर्मातील मदतीला धावणारे आमदार बाळासाहेब आजबे काका हे सर्वांनी पाहिले आहेत, परंतु त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने सत्य परिस्थिती समोर येत नाही; परंतु आता जनतेनेच ठरवलं आहे, आपल्या कामात धावलेले आजबे काका सर्वांना सांगायचं आणि पुन्हा त्यांनाच आमदार करायचं त्यामुळे प्रत्येकाच्या मदतीला धावलेले काका कशा पद्धतीने धावले हे दाखवण्याचा प्रत्येक बांधव आपापल्या परीने प्रयत्न करत आहे हे सर्व पाहिल्यानंतर आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनता म्हणत आहे आमदार तर काकाच होणार..

सौताडा गावातील भगवान पुलावळे यांच्या मुलीला ऑक्सिजनची गरज ही 24 घंटे लागत आहे काही आजारामुळे हा ऑक्सिजन द्यावा लागत आहे, आतापर्यंत सगळ्याच नेत्यांकडे त्यांचं कुटुंब गेलं होतं त्यांना कोणीच मदतीचा हातभार लावला नाही परंतु विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्याकडे मागणी करताच त्यांनी ऑक्सिजनची कायमस्वरूपी त्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि ऑक्सिजन मशीन त्यांना देऊन त्या मुलीच्या जीवाला जीवनदान दिले असं म्हटलं तर वावगं वाटायला नको कारण की ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कोरोनामध्ये लक्षात आलंच असेल त्यावरून ऑक्सिजनची किंमत आता तरी कळत आहे. पुलावळे कुटुंबीयांनी आजबे काकांच्या या मदतीबद्दल जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत. त्यांना सहकार्य करणारे सौताडा गावातील काकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आजबे काका यांचे त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहे. असे आजबे काकांनी हजारो काम केले आहेत परंतु ते जनतेपर्यंत त्यांनी दाखवण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत परंतु सर्वसामान्य जनताच म्हणत आहे आजबे काकांनी आम्हाला मदत केली आम्हाला मदत केली तेच दाखवण्यासाठी स्वतः जनताच आता सोशल मीडियावर आणि रस्त्यावर ऍक्टिव्ह झाली आहे.

असे हजारो कुटुंब आहेत की त्यांना मदत केली

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले आहे तेच काम आता जनताच सगळ्यांसमोर आणत आहे. काकांना स्वतः केलेलं काम दाखवावं असं कधी वाटलं नाही परंतु जनता म्हणती आहे. काका तुम्ही केलेलं काम आता तुम्ही नव्हे तुमचे कार्यकर्ते नव्हे आम्हीच दाखवणार त्यामुळे काकांनी सर्वसामान्यात जाऊन काम केले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे म्हणूनच जनताच म्हणते पुन्हा आमदार तर काकाच होणार...

टिप्पण्या