केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेस मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : राजु (भैय्या) जाधव



 सुरेश धस यांच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब 

पाटोदा : शिव जागृती न्यूज 

भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळात देशात रस्त्याचे जाळे निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विकासभू आमदार आष्टी विधानसभेचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सुरेश आण्णा धस यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने या जाहीर सभेस मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजु (भैय्या) जाधव यांनी केले आहे. 

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे विकासभु नेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या प्रचार सभेसाठी भारत देशाचे रस्ते विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उद्या मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.00 वा. जाहीर सभा पाटोदा शहरात आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षांच्या कार्यकर्ते पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष सर्व नगरसेवक व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार सुरेश आण्णा धस यांचे हात बळकट करावे असे आवाहन नगराध्यक्ष राजु (भैय्या) जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या