डोंगरकिन्हीत आजबेंची फक्त कॉर्नर सभाच नव्हे ; ही तर विजयाकडे वाटचाल!




आ.बाळासाहेब आजबे यांना सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद वाढला!

पाटोदा | शिव जागृती न्यूज 

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी सध्या तीनही तालुक्यांमध्ये कॉर्नर सभेचे सत्र सुरू केला आहे त्या सभेतून मिळणारा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी मोठ्या सभेपेक्षा कॉर्नर सभेलाच महत्त्व दिले आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे झालेली कॉर्नर सभा ही फक्त सभा नव्हे तर विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुरेश धस यांच्या बालेकिल्ल्यात झालेली ही विराट कॉर्नर सभा विजयाकडे वाटचाल करण्याचं ठरवलं असल्याचं डोंगरकिन्ही परिसरात ऐकायला मिळत आहे.

डोंगरकिन्ही परिसरात झालेली कॉर्नर सभा परिसरामध्ये चांगली चर्चेची ठरली आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांना जनतेचा मिळालेला प्रतिसाद हा उद्याचा विजय आहे. डोंगरकिन्ही तून इतका मोठा प्रतिसाद मिळाल्याने पाटोदा तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डोंगरकिन्ही परिसरातून अनेक गावातील युवकांनी आजबे काकांच्या कामावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी पाटोदा तालुक्यातील पदाधिकारी डोंगरकिन्ही परिसरातील पदाधिकारी नागरिक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

★अनेक गावच्या युवकांचा प्रवेश 

डोंगरकिन्ही येथे आयोजित केलेल्या कॉर्नर सभेला विराट सभेचे स्वरूप आलं आणि सर्वाधिक मताधिक्य डोंगरकिन्ही परिसरातून मिळणार असल्याचे संकेत मिळाले. यावेळी अनेक गावचा युवकांनी आमदार बाळासाहेब आजबे काकांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे काकाचे हात बळकट केले आहेत.

★आ.आजबे काकांना डोंगरकिन्ही परिसरातून मिळणार सर्वाधिक मताधिक्य!

डोंगरकिन्ही व परिसरातील नागरिकांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विजयासाठी वज्रमुठ बांधली असून अनेक गावच्या युवकांनी काकांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून काकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून सर्वाधिक मताधिक्य डोंगरकिन्ही परिसरातून देण्याचा निर्धार युवकांनी केला आहे.

टिप्पण्या