सौताडा (प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला,आरक्षण सोडत झाल्यानंतर भावी जि. प. सदस्य व भावी नगरसेवक तिकिट मिळवण्यासाठी आपल्या नेतृत्वाकडे मागणी शिफारशी करत आहेत.जामखेड जि. अहिल्या नगर येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,कला ,क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून प्राध्यापक विकी घायतडक यांच्या कडे पाहिले जाते.घायतडक यांचा लोकसंपर्क दांडगा असुन प्रत्येकाच्या सुख दुःखात ते सहभागी होतात त्यामुळे जनसामान्यांच्या मनात त्यांची प्रतिमा आपला हक्काचा माणूस अशीच आहे.कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणीत मानसिक आधार देत कोवीड बाधीत रुग्णांना कोवीड सेंटर मध्ये बेड मिळवून देण्यासाठी,रेमडेसिवर इंजेक्शन साठी आ.रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी मदत रुग्णांना केली आहे,तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा,शालेय साहित्य वाटप,विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे , पोलिस स्टेशन व पंचायत समिती कार्यालयात सामान्य माणसाला विविध अडचणींमध्ये प्रा.घायतडक सर गरजुंना शासकीय कामात मदत करतात .
जामखेड तालुक्यातील सर्व अठरा पगड समाजासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.जामखेड तालुक्यातील प्रत्येक सामाजिक प्रश्नांवर झालेल्या आंदोलनात व मोर्चात ते मास लिडरच्या भुमिकेत नेतृत्व करतात .जामखेड नगरपरिषद वार्ड क्रमांक ४ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या वार्डासाठी एक सक्षमता पर्याय म्हणून प्राध्यापक विकी सर घायतडक सर यांना लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. वार्डाचा कृती आराखडा करा व शाश्वत विकास करण्यासाठी अशा सुशिक्षित व कार्यक्षम नेतृत्वाला उमेदवारी मिळाल्यास ते नवे परिवर्तन घडवून आणू शकतील अशा प्रकारचा विश्वास मतदारांना आहे व तशीच चर्चा जामखेड शहरातील जनसामान्यांतून होत आहे.
आ.रोहीत पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून घायतडक सर यांची ओळख आहे.अशा लोकाभिमुख नेतृत्वालाच नगरसेवक म्हणून उमेदवारी दिल्यास जामखेड नगरपरिषद वार्ड क्रमांक चार मध्ये परिवर्तनाची नवी पहाट येईल अशी भावना व्यक्त होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा