पारगाव जिल्हा परिषद गटात “लाडक्या बहिण योजनेची मोफत KYC”चा माता भगिनींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा — दीपक दादा घुमरे
पाटोदा: शिव जागृती न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने पाटोदा तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटात “लाडक्या बहिण योजनेची मोफत KYC मोहीम” राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश शासनाच्या महिला कल्याण योजनांचा लाभ प्रत्येक पात्र भगिनीपर्यंत पोहोचवणे व महिलांना प्रशासनाशी जोडून त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे.या मोहिमेबाबत माहिती देताना दीपक दादा घुमरे म्हणाले,महिलांसाठी राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे, पण अनेक भगिनींची KYC अपूर्ण असल्याने त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या माध्यमातून पारगाव गटात ही मोहीम हाती घेतली असून, सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत.या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षित स्वयंसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते महिलां भगिनींना KYC पूर्ण करण्यास मदत करतील.दीपक दादा घुमरे पुढे म्हणाले की, “लाडक्या बहिण योजना ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाची योजना आहे. कोणतीही पात्र महिला शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, हीच या मोहिमेची प्रमुख प्रेरणा आहे.” पाटोदा तालुका राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे कार्यकर्ते ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक दादा घुमरे यांनी केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा