अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर



शिव जागृती न्यूज

 एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींची भरीव मदत महाविकास आघाडी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकार हे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जून ते ऑक्टोबर २१ या कालावधीत नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना NDRF च्या निकषांची वाट न पाहता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत जाहीर करण्यात आली.

जिरायतीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये, बागायतीसाठी प्रति हेक्टर १५  हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनींसाठी प्रति हेक्टर ३७.५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून ही मदत २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत करण्यात येईल.


सणासुदीच्या काळात नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तातडीची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री मा. श्री. बाळासाहेबजी थोरात साहेब , सामाजिक न्याय मंत्री मा.श्री धनंजय मुंडे साहेब तसेच महाविकास आघाडी सरकारचे जनतेकडून मनस्वी आभार मानले जात आहे.

टिप्पण्या