पाटोदा *(गणेश शेवाळे)* महाराष्ट्र सरकारने या वर्षी ई पीक पहाणी अॅप सुरू केले आहे. महसुल विभाग आणी कृषी विभागाच्या वतीने ई पिक पाहनी संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे.
राज्यातील काही जिल्हयां मध्ये ई पिक पाणी अॅपला शेतकऱ्यानी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी ई पिक पहाणी अॅपचा वापर कसा करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे, यामुळे शेतकऱ्यांना या ॲपची माहीती देण्याचे काम कृषीदुत आवारे दिलीप भाउसाहेब करत आहेत.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी संलग्न आनंद चारीटेबल ट्रस्ट संचलित श्री छत्रपती शाहू फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी चे
दिलीप आवारे विद्यार्थी असून कृषीदुत आवारे दिलीप याने जामखेड तालुक्यातील माळेवाडी गावात सुरू असलेला ग्रामीण कृषी कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत ई. पीक पाहणी अॕपचा वापर कसा करावा याची माहीती शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिली.यामध्ये पिकाची नोंदणी कशी करावी याची माहिती दिली. माळेवाडी येथील शेतकरी,भाऊसाहेब आवारे, सोमा विधाते, गणेश आवारे, नारायण राउत, आश्रू रोडकर, आशोक गवळी, सुरेश गवळी,रामकिसन विधाते, चौधरी आशोक आदी शेतकरी उपस्थित होते. या वेळी प्राचार्य डॉ.प्रा. आरसुळ एस.आर व कार्यक्रम अधिकारी प्रा. बनकर एस. एल. यांचे मार्गदर्शन ही शेतकऱ्यांना लाभले.बळीराजाला कृषीदुत दिलीप आवारे यांच्या माध्यमातून आधुनिक ई पीक पाहणी अँपचे महत्त्व पटले ,यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात यांचा खुप फायदा होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा