पाटोदा :गणेश शेवाळे
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडील वाहनाखाली शेतकऱ्यांचा
झालेला मृत्यू माणुसकीला काळीमा फासवणा-या या घटने नंतर देशात उसळलेली संतापाची लाट यांच्या निषेधार्थ आज दि.११ आँक्टोंबर रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतिने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले.
पाटोदा येथील व्यापारी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत व्यापाऱ्याने पाटोदा कडकडीत बंद ठेवून महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली पाटोदा बंदचे आवाहन करण्यात आले होते,यास शहरातील व्यापाऱ्याने बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला ह्या गंभीर घटनेच्या भावना शासनाकडे पोहचविण्यासाठी पाटोदा तहसिल ला निवेदन देवून ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व मिञ पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा