पाटोदा : गणेश शेवाळे
जीएचपीएस स्कुल पंजाबी बाग न्यु दिल्ली येथे राष्ट्रीय कराटे चैपियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.ज्यामध्ये महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारे मास्टर कंकर सिंग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली खालसा स्पोर्ट अॅकडमी पाटोदा जि.बीड च्या १९ खेळाडूनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये १० मुले व ९ मुलींनी सहभाग नोंदवला होता.त्यामधील ११ खेळाडूनी पदकावर आपले नाव कोरले आहे.त्यामध्ये २ सुवर्ण, ५ रौप्य, ४ कांस्य पदक मिळवले आहे.
तनुजा येवले, नेमाने अमृता , घुमरे सुप्रिया ,पाटोळे मयुरी ,खाडे तनुजा ,भंडारे प्रेरणा ,देशमाने नंदिनी, राऊत भक्ती, राठोड अरुणा ,सानप राहुल ,घुमरे गणेश, राख भागवत, संचेती श्रेयश , कुलविंदर सिंग टाक, हरविंदरसिंग टाक ,दहिफळे कृष्णदास ,येवले रोहित ,जावळे ओमकार ,सानप मोहित या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय शिख स्पर्धेत अनेक राज्याच्या खेळाडूनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये खालसा स्पोर्ट अॅकडमी पाटोदा जि.बीड (महाराष्ट्र) च्या खेळाडूने चांगले प्रदर्शन करत आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. माता देविंदर कौर खालसा आणि सतगुरु तेरी ओट ट्रस्ट यांनी खेळाडूचे धैर्य वाढवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा