➡️ राज्यभर आदर्श घेण्याजोगा पाटोदा संजय गांधी विभागाचा कारभार
पाटोदा :गणेश शेवाळे
आजकाल सरकारी काम, पैसे देऊन ही वर्षे दोन वर्षे थांब! अशीच परस्थिती कुठेही पाहायला मिळते. यामुळे खरे माणसं योजना पासून लांब राहतात, मात्र याला पाटोदा संजय गांधी श्रावण बाळ विभाग असून राज्यात आदर्श घ्यावा असा पाटोदा संजय गांधी श्रावण बाळ विभागाचा कारभार कमिटीचे अध्यक्ष भुषण जाधव झाल्या पासून पाहायला मिळत आहे.
पाटोदा संजय गांधी श्रावणबाळ कमिटीच्या अध्यक्ष व सदस्याने प्रथम लाभार्थी गावोगावी घरोघरी फिरून खरे लाभार्थी शोधून त्यांच्या रुपयाही न घेता प्रस्ताव करून मंजूर करून त्यांचे मंजुरी प्रमाणपत्र विभागाचे नायब तहसीलदार व कमिटीच्या सदस्यानी घरो घरी फिरून वाटप केल्याचे पाटोदा तालुक्यात नव्हे तर राज्यात पहिल्यांदाच दहा वीस वर्षात पाहायला भेटले आहे.
पाटोदा शहरात अधिकारी व लोक प्रतिनिधी गल्लोगल्ली फिरून वंचित गोरगरीब लोकांच्या घरी जाऊन काम करु लागल्यामुळे सामान्य नागरिक संजय गांधी श्रावणबाळ कमिटी व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यक्रत्याचे टाळ्या वाजून स्वागत करत असून संजय गांधी श्रावणबाळ विभागाच्या दमदार कामगिरी पाहून पाटोदा तालुक्यातील नागरिकांना नायक पिचर मधील एक दिन का सीएम असलेल्या अनिल कपूरची आठवण झाली असून ,अशीच परिस्थिती राज्यभर झाली तर एकही गरीब माणुस योजना पासून लांब राहणार नाही. पाटोदा संजय गांधी श्रावण बाळ विभागाच्या आदर्श राज्यभर आदर्श घ्यावा,अशी कामगिरी पाटोदा तालुक्यातील संजय गांधी समिती करत आहे.
"समिती आपल्या दारी" या मोहिमेमध्ये पहिल्याच बैठकीमध्ये कोणताही अनाठाई खर्च न करता मंजूर झालेल्याचे प्रमाणपत्र चे घरोघरी जाऊन वाटप करताना नायब तहसीलदार टाक, युवा नेते यश आजबे, तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव व संजय गांधी समितीचे प्रमुख सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा