बीड मतदार संघात काँग्रेसला नवसंजीवनी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष गणेश बजगुडे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश
पाटोदा: शिव जागृती न्यूज नेटवर्क
शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी आज २४ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार रजनीताई पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राहुल भैय्या सोनवणे, नवनाथ थोटे, नारायण होके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गणेश बजगुडे हे विद्यार्थी दशेपासुन गेली वीस वर्षे बीड जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बीड शहराध्यक्ष पदापासून सुरवात करत छावा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष, शिवसंग्रमचे प्रदेश कार्याध्यक्ष ते शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते गेली अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्व परिचित आहेत. बीड जिल्ह्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार, विद्यार्थी यांच्या विविध मागण्यांसह मराठा आरक्षण, शिवस्मारक, बीड जिल्हा रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून अतिशय आक्रमक पवित्रा घेत केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनातुन व आपल्या वक्तृत्व व कर्तृत्वाने बीड जिल्ह्यातील एक आक्रमक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहीतले जाते. त्यांच्याकडे संघटन कौशल्य व गेली अनेक वर्ष केलेला कार्याचा अनुभव आसुन बीड विधानसभा मतदार संघात गणेश बजगुडे यांना मानणारा प्रामुख्याने मोठा वर्ग व मतदार संघात त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला बीड तालुका व विधानसभा मतदार संघात नवसंजिवनी मिळेल. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई व बेरोजगारी रोखायची आसेल तर तरुणांनी काँग्रेस स्वीकारायला हवी. काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य प्रेरणादायी व गोरगरीब सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत. गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिक काम करणार असल्याचे गणेश बजगुडे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार रजनीताई पाटील, माजीमंत्री अशोकराव पाटील, आदित्य पाटील यांच्यासह बीड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा